समाजकंटकाकडून महादेव मंदिराची विटंबना; अविष्कार कॉलोनीतील घटना

Foto

औरंगाबाद: काही  अज्ञात समाज कंटकांनी आविष्कार कॉलोनी भागातील कर्णेश्वर महादेव मंदिरात विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे.पोलीस त्या समाजकंटकांचा शोध घेत आहे.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आविष्कार कॉलोनी भागातील कर्णेश्वर महादेव मंदिरात काही अज्ञात समाज कंटकांनी चॅनेलगेट मधून मंदिराच्या आत अंडे फेकल्याची घटना रहिवाशांच्या आज सकाळी मंदिरात दर्शनासाठी गेले असताना समोर आली. ही माहिती मिळताच भाजपचे नगरसेवक  शिवाजी दांडगे व मकरंद कुलकर्णी अनेक जण जमा झाले होते. त्यांनी पोलिसांना माहिती दिली.सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी तात्काळ घटनस्थळी धाव घेत  घटनस्थळाची पाहणी केली. रहिवाशांकडून माहिती घेतली.नागरिकांनीही समजूतदार पनांची भूमिका घेत  तरुणांनी मंदिराची साफसफाई केली. सिडको पोलीसांकडून  परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम सुरू आहे.

तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकावर कारवाई व्हावी
शहराचा सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या हेतूने असे कृत्य करणार्‍या सामाजकंटकावर गुन्हे दाखल करण्यात यावे. व नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये 
- शिवाजी दांडगे (भाजप नगरसेवक)